मंडणगड : कडक लाॅकडाऊननंतरही ग्रामीण भागातील काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पोलिसांनीही आरोग्य यंत्रणेप्रमाणे घरोघर जाऊन काम सुरू केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून दत्तक गाव मोहिमेंतर्गत बाणकोट सागरी पोलीस ठाण्यातर्फे दांडा परिसरातील ग्रामस्थांची घराेघरी जाऊन ऑक्सिजन व तापमान तपासण्यात आले.
यावेळी लोकांना कोरोना संदर्भातील सोशल डिस्टन्सिंग पाहणे, मास्क वापरणे, गावातील लोकांच्या कोरोना चाचण्या वाढविणे, कुणाला सर्दी ताप, आदी लक्षणे असतील तर त्याला धीर देत दवाखान्यात पाठविणे अशा प्रकारे जनजागृती केली. तसेच काेराेनापासून घ्यायची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कोरोनासंदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील लोक ताप, सर्दी असेल तर दवाखान्यात जात नाहीत. त्यामुळे कोरोना संदर्भातील तपासण्या वेळेत होत नाहीत. परिणामी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
.......................................
मंडणगड तालुक्यातील वेळास दांडा परिसरातील ग्रामस्थांची ऑक्सिजन व तापमान पाेलीस निरीक्षक उत्तम पिठे यांनी तपासणी केली. मंडणगड तालुक्यातील वेळास दांडा परिसरातील ग्रामस्थांची ऑक्सिजन व तापमान पाेलीस निरीक्षक उत्तम पिठे यांनी तपासणी केली.