शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

भरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:13 PM

Accident Ratnagiri- ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

ठळक मुद्देभरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू हातखंबा येथील दुर्घटना, महिला गंभीर जखमी

रत्नागिरी : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथील राजेश आणि ऋतुजा आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन रत्नागिरीतील रुग्णालयात आले होते. तेथून आपली इतर कामे आटोपून ते झरेवाडीकडे जात होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते हातखंबा येथे पोहोचले.हातखंबा गावातील बसथांब्यावर तेव्हा एक आरामबस उभी होती. एक ट्रक (एमएच ४२- टी १३०१) या बसला ओव्हरटेक करून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. या ट्रकने धुमक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकी जवळजवळ २०० मीटर ट्रकसोबत फरपटत गेली. दुचाकीवरील राजेश, ऋतुजा आणि साई हे तिघेही फेकले गेले.गंभीर दुखापत झालेल्या राजेश यांचा जागीच मृत्यू झाला. ऋतुजा आणि साईश हे दोघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने साईशची प्राणज्योत मालवली. ऋतुजा यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.मुलाला आणले होते रुग्णालयातराजेश धुमक आणि ऋतुजा हे दाम्पत्य मुलाला घेऊन रत्नागिरीला रुग्णालयात उपचारासाठी आले होते. रुग्णालयातील काम आटोपून ते घरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर त्यांची बॅग जवळच पडली होती. फरफटत गेलेल्या दुचाकीचा व त्याच्या नंबरप्लेटचा चुराडा झाला होता. त्यामुळे या गाडीचा नंबरही मिळू शकला नाही.ट्रकचालकाचा पळण्याचा प्रयत्नअपघातानंतर ट्रकचालक शेखर राजेंद्र कोंडे (रा. सोनाळवाडी, अहमदनगर) जंगलातून पळत होता. महामार्गावर ईश्वर ढाब्यानजीक त्याला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. तो ट्रकमधून साखरेची पोती घेऊन जयगडकडे जात होता. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी