रत्नागिरी : लग्नाच्या वरातीत बारबालांचा नाच ही रत्नागिरीच्या संस्कृतीला गालबोट लावणारी घटना आहे. पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेची जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिसांनीही गंभीर दखल घ्यावी. त्यामुळे भविष्यात हे प्रकार रत्नागिरीत होणार नाहीत. याबाबत आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. वरातीत नाचणाऱ्या या बारबालांवर पैसेही उधळण्यात आले. त्यांच्या नृत्याच्या क्लीप्सही सर्वत्र फिरू लागल्या आहेत. रत्नागिरीच्या संस्कृतीला डाग लावणारी ही घटना असून, असे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत, असेही सामंत म्हणाले. शहरातील अनेक भागात धूम स्टाईल वाहने हाकणाऱ्या व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी चांगलीच हजेरी घ्यावी. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यांच्या पालकांवरही जर कारवाई झाली तर ती अधिक परिणामकारक होईल. आपले पाल्य स्पीडच्या गाड्या घेऊन शहरात काय उद्योग करतात, हे त्यांच्या पालकांनाही कळेल, असे सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)स्काय वॉकला लवकरच सुरुवातस्काय वॉक, बंदरातील सुविधा, मांडवी जेटीचे सुशोभिकरण, रस्ते डांबरीकरणसह शहरातील २१ कोटींच्या कामाना निधी उपलब्ध झाला असून, लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. शहरप्रमुखपदी शेरेच...शिवसेनेचे रत्नागिरी शहरप्रमुख प्रमोद शेरे यांनी काही महिन्यांपूर्वीच पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारलेला नाही. त्यांची अजून पक्षाला आवश्यकता असल्याचे सामंत म्हणाले.
बारबालांचा नाच हे संस्कृतीला गालबोटच
By admin | Published: November 19, 2014 9:26 PM