शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

जिल्ह्यातील ‘सावित्रीच्या ६२६५ लेकीं’साठी दत्तक योजनेचा आधार

By admin | Published: March 09, 2015 9:29 PM

--सावित्रीबाई फुले स्मृतिदिन

शोभना कांबळे - रत्नागिरी -पालकांच्या हलाखीच्या स्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड न पडता त्यांना सहायभूत ठरावी, या उद्देशाने महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासनाने सुरू केलेल्या दत्तक - पालक योजनेमुळे जिल्ह्यातील सावित्रीच्या ६२६५ लेकींना शिक्षणाचा हातभार मिळत आहे.शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी शासनाने वेळोवेळी विविध योजना अमलात आणल्या आहेत. तरीही अनेक मुली, महिला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या पालकांची हलाखीची स्थिती. हे लक्षात घेऊन मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा, या उद्देशाने ज्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ निर्माण केली, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासनाने १९८३ - ८४मध्ये ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ सुरू केली. यामुळे समाजातून मुलींच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. या मुलींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत आहेत. पहिली ते आठवीच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास, तसेच शहरातील झोपडपट्टीतील गरजू मुलींना अनुसूचित जाती, जमाती, भटक्या आणि विमुक्त जातीतील मुलींचा या योजनेसाठी प्राधान्याने विचार केला जातो. आतापर्यंत या योजनेंतर्गत २ कोटी २० लाख ९६,००० एवढा निधी मुदत ठेव स्वरूपात जमा आहे. या मुदत ठेव स्वरूपात जमा झालेल्या रकमेतून दरमहा ३० रूपयेप्रमाणे दहा महिन्यांकरिता ३०० एवढी शैक्षणिक आर्थिक मदत दिली जाते.ग्रामीण भागातील तसेच गरजू मुलींना शैक्षणिक सुविधा मिळणे कठीण असल्याने त्यांच्या पालकांना नाईलाजाने त्यांचे शिक्षण थांबवावे लागत होते. मात्र, आता त्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी शासनाने ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ सुरू केल्याने आज सावित्रीच्या हजारो लेकी सन्मानाने शिकत आहेत. या योजनेमुळे आर्थिक सहाय्याचा हात पुढे करणाऱ्या समाजातील अनेक व्यक्तींमुळे गरजू मुलींना शिक्षण सोपे झाले आहे. जिल्ह्यात २०१४ - १५ या कालावधीत या योजनेचा लाभ पहिली ते आठवीतील एकूण ६२६५ गरजू विद्यार्थिनीना मिळाला. सर्वाधिक लाभ खेड तालुक्यातील १०१९ विद्यार्थिनीना मिळाला आहे. नगरपरिषदेच्या शाळांमधील ६७ विद्यार्थिनींनाही याचा लाभ मिळाला. आहे. या योजनेसाठी १८ लाख ७९ हजार ५०० इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तालुकासंख्यारक्कममंडणगड३७७१,१३,१००दापोली७६०२,२८,०००खेड१०१९३,०५,७००चिपळूण७१०२,१३,०००गुहागर४५३१,३५,९००संगमेश्वर९४०२,८२,०००रत्नागिरी८३९२,५१,७००लांजा३९०१,१७,०००राजापूूर७१०२,१३,०००नगरपरिषद६७२०,१००एकूण६२६५१८,७९,५००शासनाने १९८३ - ८४मध्ये सुरु केली ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’.आर्थिक सहाय्याचा हात पुढे करणाऱ्या समाजातील अनेक व्यक्तींमुळे गरजू मुलींना शिक्षण सोपे.पालिकेच्या शाळांमध्येही मिळाला लाभ.