शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगावी

By admin | Published: May 25, 2016 10:27 PM

प्रदीप पी. यांची सूचना : प्रत्येक विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करावा

रत्नागिरी : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच सर्व यंत्रणांनी आपल्याकडील यंत्रसामुग्री सुस्थितीत ठेवून मनुष्यबळाचे नियोजन करावे आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. पावसाळ्यात प्रत्येक विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित केली होती. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी विजय राठोड, परिविक्षाधिन अधिकारी पाटणकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पुसावळे, निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर तसेच विविध शासकीय, निमशासकीय खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रकार होत असतात. दरड कोसळून रस्ता बंद झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी बांधकाम विभागाने सज्जता ठेवावी. तसेच दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांचे सर्व्हेक्षण करुन किती घरे, व्यक्ती बाधित होतील, याची संभाव्य आकडेवारी तयार करून त्यावरील उपाय याचा अहवाल संबंधित यंत्रणांनी सादर करावा. आपत्ती काळात तातडीने मदत पोहचवण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात शीघ्र कृती दल (क्वीक अ‍ॅक्शन टीम) तयार करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.या टीममध्ये महसूलसह बांधकाम, आरोग्य, पोलीस, महावितरणचे कर्मचारी, रुग्णवाहिका यांचा समावेश असेल. या टीमच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त ठिकाणी तातडीने मदत पोहचवण्याची सज्जता ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आपत्तीची माहिती तातडीने मिळण्यासाठी गावपातळीवर पोलीसपाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची त्या त्या स्तरावर संबंधित यंत्रणेने बैठका घेऊन त्यांना सूचना द्याव्यात, असेही ते म्हणाले.नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नदी नाल्यांची स्वच्छता करुन घ्यावी. तसेच पाण्यापासून उद्भवणारे आजार टाळण्यासाठी आपापल्या क्षेत्रातील पाण्याचे क्लोरिनेशन करण्यात यावे, त्याचप्रमाणे नगरपरिषदांनी कीटकनाशके फवारणी जास्तीत जास्त वेळा करावी, अशा सूचनाही प्रदीप पी. यांनी दिल्या. इतर विभागांनीही आपापल्या क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांची पूर्तता करावी आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिचा सामना करण्यास आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, असे सांगितले. यावेळी सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)