रत्नागिरी : शहर पोलीस स्थानकात आपल्याविरोधात तक्रार दिल्याच्या कारणावरुन महिलेच्या नणंदेला शिवगाळ व मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान राजीवडा येथे घडली. यावेळी तक्रार करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन व मोबाईल हिसकावून पळ काढल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी आस्फिया ताहिर मुल्ला (३१, सध्या रा. राजनगर) यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यानुसार फैमिदा काझी, फैरोजा म्हसकर आणि फिझा काझी यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवराेधात काही दिवसांपूर्वी पाेलीस स्थानकात तक्रार देण्यात आली हाेती. याचा राग मनात धरून शुक्रवारी संशयितांनी आस्फिया मुल्ला हिच्या नणंदेला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच आस्फिया यांच्या गळ्यातील १४ ग्रॅमची सोन्याची चेन व व्हिवो कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले करत आहेत.