शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

नीलिमा चव्हाण खून प्रकरण: बेपत्ता होण्याआधी नीलिमाचे लोकेशन होते कोंडिवली धरण, मृत्यूचे गूढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 11:41 AM

खेड स्थानकात तिने चिपळूणला जाणारी बस पकडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे

दापोली : घरी जाण्यासाठी निघालेली नीलिमा बेपत्ता झाली आणि दोन दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. ज्या दिवशी ती बेपत्ता झाली, त्या दिवशी तिचा मोबाइल खेड तालुक्यातील कोंडिवली धरण परिसरात होता. तेथे ती कशी गेली, तिच्यासोबत कोण हाेते, तिचा मृतदेह दाभोळ खाडीत कसा गेला, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अजून सापडलेली नाहीत. चार दिवस झाले तरी नीलिमाच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी असलेली नीलिमा चार महिन्यांपूर्वीच दापोलीतील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला लागली होती. तेथे ती एका खासगी वसतिगृहात राहत होती. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुटी असल्याने आपण गावी येत असल्याचे तिने शुक्रवारी (दि. २८ जुलै) आपल्या भावाला फोनवरून कळविले. त्यानुसार शनिवार २९ रोजी सकाळी ती दापोलीहून एस.टी. बसने खेडला निघाली. खेड स्थानकात तिने चिपळूणला जाणारी बस पकडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.चिपळूणला जाण्यासाठी निघालेली नीलिमा चिपळूणपर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर दिवसभर तिच्या मोबाइलचे लोकेशन कोंडिवली धरण परिसरात असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यानंतर तिचा मोबाइल बंद झाला.नीलिमाच्या नातेवाइकांनी तिला दापोली, खेड, चिपळूण परिसरात शोधले. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर मंगळवारी, दि. १ ऑगस्टला तिचा मृतदेह दाभोळ खाडीमध्ये सापडला. तिच्या डोक्यावरील केस व भुवया मशीनने काढून टाकण्यात आल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते पाहता हा घातपातच असल्याचा नातेवाइकांचा दाट संशय आहे. तिचा मृत्यू कशामुळे झाला, हा घातपात आहे का, असेल तर यागामे कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी नाभिक समाज संघाने केली आहे.

उत्तरे नसलेले अनेक प्रश्नखेड बसस्थानकात चिपळूणला जाणारी गाडी पकडणारी नीलिमा कोंडिवली धरण परिसरात कशी गेली? तिच्यासोबत कोण होते? ती स्वत:हून गेली असेल तर तिच्यासोबतची व्यक्ती तिच्या ओळखीची असणार. ती व्यक्ती कोण होती? कोंडिवली धरण परिसरात तिचे शेवटचे लोकेशन दिसत असताना तिचा मृतदेह दाभोळ खाडीत कसा सापडला? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची उत्तरे अजून स्पष्ट झालेली नाहीत.

तेव्हाच शोधले असते तर...शनिवारी नीलिमा बेपत्ता झाली तेव्हा तिचे लोकेशन कोंडिवली, अंजनी धरण दिसत होते. शनिवारी रात्रीपर्यंत तेच लोकेशन असल्याची माहिती पुढे येत आहे. तिच्या भावाने पोलिसांची मदत मागितली होती. त्याच वेळी पोलिसांनी तत्परता दाखवून शोध घेतला असता तर कदाचित तिचा जीव वाचला असता. परंतु, पोलिसांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाईक करीत आहेत.

सहा पथकांमार्फत तपासदापोली पोलिस स्थानकात आत्महत्या म्हणून प्रथम हे प्रकरण दाखल झाले. मात्र, समाजाच्या रेट्यामुळे आता हा प्रकार नेमका काय आहे, याचा तपास सुरू झाला आहे. दापोली, खेड, चिपळूण या तीन ठिकाणी सहा पथकांच्या माध्यमातून नीलिमाच्या मृत्यूचा तपास केला जात आहे. आता पोलिसांनी या चौकशीला अधिक गती दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस