पाचल : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंर्तगत तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तळवडे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. आमदार राजन सळवी यांच्याहस्ते सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, उपसरपंच चंद्रकांत गुरव व ग्रामसेवक संतोष चव्हाण यांच्याकडे हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील उत्कृष्ट घरकुल यासाठी भागिर्थी पांचाळ याना सन्मानित करण्यात आले. तळवडे ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना गावात यशस्वीपणे राबवून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल या ग्रामपंचायतीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
तळवडे ही ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार, हागणदारीमुक्त गाव आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सुधाकर पेडणेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजना गावात यशस्वीपणे राबविली होती. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.