रत्नागिरी : यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातगाव कोसबी गावच्या सुवरे वाडीच्या जवळच पाच ते सहा फूट जमीन खाली खचली आहे. हा भाग डोंगराचा असून, पायथ्याशी जयगडची खाडी आहे. जमीन उताराची असल्याने सुमारे किमान १ किलोमीटर लांब व किमान ५ ते ६ फूट खोल भेग व इतर ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या भेगा व खड्डे पडले आहेत.वाडीतील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गणेशचतुर्थीच्या दरम्यान जमीन खचण्यास सुरुवात झाली. त्यावेळी १ ते २ फूट खोल भेग होती. मात्र आता या भेगा खोलवर गेल्या आहेत. याच पावसात या ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या जमिनीचे भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्याकडून सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ सुवरे व वाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.
भातगाव-कोसबी येथे डोंगर खचला, पाच ते सहा फूट जमिनीला भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 3:54 PM
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातगाव कोसबी गावच्या सुवरे वाडीच्या जवळच पाच ते सहा फूट जमीन खाली खचली आहे. हा भाग डोंगराचा असून, पायथ्याशी जयगडची खाडी आहे. जमीन उताराची असल्याने सुमारे किमान १ किलोमीटर लांब व किमान ५ ते ६ फूट खोल भेग व इतर ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या भेगा व खड्डे पडले आहेत.
ठळक मुद्देभातगाव - कोसबी येथे डोंगर खचलापाच ते सहा फूट जमिनीला भेगा