पाली : गेले पाच दिवस पाली परिसरातील भारत संचार निगमची सेवा बंद असल्याने अनेक शासकीय सेवांसह ग्राहकांनाही याचा फटका बसला आहे. अनेक शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये भारत संचारची इंटरनेट सेवा वापरली जात असल्याने तीच बंद असल्याने कामकाजावर परिणाम होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत.
पाली येथील दूरध्वनी केंद्राचे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर येथील केंद्र बंद आहे. तसेच रत्नागिरी येथील भारत संचारच्या कार्यालयाचे दूरध्वनी उचलले जात नसल्याने तक्रार कोठे करायची हाही ग्राहकांसमोर प्रश्न आहे. तसेच भारत संचारचा पाली येथील मोबाइल टाॅवर हा गेले पाच दिवस बंद असल्याने सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे भारत संचारने अत्यावश्यक सेवेतील मोबाइल टाॅवरची बंद सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.