शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

साखरप्यात वन विभागाची मोठी कारवाई

By admin | Published: January 08, 2017 10:53 PM

विनापरवाना लाकूड वाहतूक : सहा लाखांचा माल हस्तगत, वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले...

देवरूख : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकावर वन विभागाने कारवाई करीत ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई ६ जानेवारी रोजी रात्री साखरपा येथे करण्यात आली. यावेळी ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने हस्तगत केला आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विनापरवाना जंगलतोडीला ऊत आला आहे. ग्रामीण भागात सर्रासपणे जंगलच्या जंगले भुईसपाट केली जातात आणि त्याची बिनदिक्कतपणे वाहतूक केली जाते, असा आरोप होत होता. काही ठिकाणी परवाना घेऊन वृक्षतोड केली जाते. तर काही ठिकाणी एकाच परवान्यावर अनेकवेळा वृक्षतोड करण्यात येते. तालुक्यातुन वृक्षतोडीबद्दल अनेक तकारी प्राप्त झाल्याने वन विभागाने या विनापरवाना वृक्षतोडीला चाप बसावा याकरिता मुर्शी तपासणी नाका येथे भरारी पथकाची नेमणूक केली होती. दरम्यान, साखरपा येथून विनापरवाना लाकडाची वाहतूक होणार असल्याची खबर वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर कोल्हापूर दक्षता पथकाचे विभागीय वन अधिकारी विजय भोसले, रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला होता.संगमेश्वर-देवरूख विभागाचे वनपाल विलास मुळे, वनरक्षक दिलीप आरेकर यांनी साखरपा हद्द्ीमध्ये रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर लाड यांच्या पेट्रोल पंपाजवळ लांजा येथून कोल्हापूरकडे विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा ट्रक (एमएच १३ आर ३०२३) मालक व चालक भारत नायकुडे (मुर्शी) याला मुद्देमालासह पकडले. यावेळी ट्रक मुद्देमालासहित जप्त करण्यात आला. सुमारे ५ लाख ८५ हजार रुपयांचे लाकूड या ट्रकमध्ये सापडले. विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरच्या दिशेने निघाल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यानुसार वन विभागच्या अधिकाऱ्यांनी यासाठी सापळा लावला होता. यावेळी वन विभागाने या ट्रकचा पाठलाग करत तो ताब्यात घेतला.त्यानंतर ट्रकमधील लाकूड व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमधून विनापरवाना लाकडाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वन विभागाचे एस. एन. सावंत, बी. बी. देसाई यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई केली. (प्रतिनिधी)