रत्नागिरी : गुहागर आणि देवरुख येथे होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजोळे येथे गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीनजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून वाहनासह काळा गूळ व अन्य साहित्य मिळून १४ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री गस्त घालत असताना मिळालेल्या मौजे मिरजोळे पाटीलवाडीकडून करबुडेकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी गणेश विसर्जन घाटाजवळ नदीकिनाऱ्याच्या भागात एक सहाचाकी चॉकलेटी रंगाचा आयशर ट्रक उभा असलेला दिसून आला.
त्याची तपासणी केली असता या वाहनात माल ठेवण्याच्या जागी १० किलो मापाच्या ६८० इतके नग काळ्या गुळाच्या ढेपी प्लास्टिकच्या वेस्टनात बांधलेल्या आढळल्या. तसेच ५ किलो मापाच्या ३६ काळ्या गुळाच्या ढेपी प्लास्टिकच्या वेस्टनात बांधलेल्या आढळल्या. वाहनासमवेत असलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.जयदीप पाटील (३७, कऱ्हाड ), मिलिंद चव्हाण (३१, कऱ्हाड), शामराव जाधव (४२, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. मिरजोळे पाटीलवाडी नदीकिनारी असलेल्या विसर्जन घाटाजवळ छापा घातला असता तेथे गावठी हातभट्टी निर्मिती केंद्रावर लाखोंचा मुद्देमाल सापडला.
यामध्ये अंदाजे १० किलो मापाच्या काळ्या गुळाच्या ६८० ढेपी प्लास्टिकच्या वेस्टनात बांधलेल्या, ५ किलो मापाच्या काळ्या गुळाच्या ३६ ढेपी प्लास्टिकच्या वेस्टनात बांधलेल्या आढळल्या.
एक सहा चाकी आयशर कंपनीचा चॉकलेटी रंगाचा ट्रक, एक काळ्या रंगाची प्लास्टिकची ताडपत्री, सुमारे २०० लीटर मापाचे गूळनवसागर मिश्रीत रसायनाने भरलेली प्लास्टिकची ९ बॅरेल, २०० लीटर मापाची लोखंडी पत्र्याची २ बॅरेल, भट्टी, २० लीटर मापाचा प्लास्टिकचा गावठी हातभट्टीच्या दारुने भरलेला एक कॅन असा एकूण १४ लाख ६५ हजार ५०० चा माल हस्तगत करण्यात आला.