देवरुख: संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या कोळंबे येथे डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मुजीब सोलकर असे मृताचे नाव आहे आहे. आज, सोमवारी (दि.२) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा गावासह परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी करुन महामार्ग रोखून धरला. मृत मुजीब यांचे कुटुंबीय, नातेवाईकही अपघातस्थळी जमा झाले आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.अपघातातील डंपर एका कंपनीचा असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, डंपरचालक पळून गेल्याने व कंपनीचे अधिकारी वेळीच घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त जमावाने वाहतूक रोखून धरली आहे. दोन तास उलटून गेले तरी अद्याप कोणीच घटनास्थळी दाखल न झाल्याने जमाव संतप्त झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, ग्रामस्थांचा रास्तारोको
By अरुण आडिवरेकर | Published: December 02, 2024 3:55 PM