रत्नागिरी : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेवर कोणतेही उत्तर न देता रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.
भाजप कार्यकर्ता संमेलनानिमित्त मुख्यमंत्री प्रमाेद सावंत रत्नागिरीत आले हाेते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपने तिन्ही मतदारसंघांवर दावा केल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे (ता. खेड) येथील आपल्या सभेपूर्वी भाजपला फटकारले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा आहे. भाजपला सगळ्या पक्षांना संपवून एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, असा प्रश्न त्यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कोणी काय आरोप केले आहेत यात मी जात नाही. मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आणि भाजपचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी दौरा करत आहोत. कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, ते मी ऐकले आहे
‘अबकी बार ४०० पार’च्या दिशेने तयारीमुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ‘अबकी बार ४०० पार’ असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मी केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. कार्यकर्त्यांचा, लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा प्रतिसाद पाहता ४०० पार ही गोष्ट अशक्य नाही