शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

देवेंद्र फडणवीस यांच्या रत्नागिरीतील दौऱ्यावर भाजप पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार, वरिष्ठांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 4:08 PM

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथे शनिवारी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाैऱ्याकडे खुद्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवल्याने ...

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथे शनिवारी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाैऱ्याकडे खुद्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवल्याने साऱ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. पाली येथील हेलिपॅड आणि नाणीज येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दाैऱ्यावरच बहिष्कार टाकल्याची चर्चा रंगू लागली आहे.जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त २१ ऑक्टाेबर राेजी नाणीज येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याचे २० ऑक्टाेबर राेजी रात्री उशिराने सांगण्यात आले. शनिवारी सकाळी त्यांचे पाली (ता. रत्नागिरी) येथील हेलिपॅडवर आगमन झाले. याठिकाणी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. मात्र, याठिकाणी भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.त्यानंतर उपमुख्यमंत्री मंत्री सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी गेले. तिथेही काेणीही पदाधिकारी न आल्याने ही बाब उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत चाैकशीही केली. त्यावेळी ‘माझ्या घरी आले म्हणून आले नसतील; पण नाणीज येथे येतील,’ असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

त्यानंतर नाणीज येथील मुख्य कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस गेले असता तिथेही भाजपचा एकही पदाधिकारी त्यांच्या स्वागताला अथवा भेटीला आलेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली. भाजप जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह पक्षातील नेतेमंडळींनी अनुपस्थिती दर्शवीत उपमुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यावरच बहिष्कार टाकल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षातील वरिष्ठांनाही कल्पना दिल्याची चर्चा आहे.

वरिष्ठांना फाेनदाैऱ्यात काेठेही भाजपचा एकही पदाधिकारी न फिरकल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री रवींद्र चव्हाण यांना फाेन केला. त्यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे.

खासगी दौराहा त्यांचा खासगी दौरा हाेता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे अनेक कार्यकर्ते दुरावल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेते येऊनही पदाधिकारी न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा