राजापूर (रत्नागिरी) : केंद्रासह राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सत्तेमुळे आलेल्या मस्तीमुळे यांचा उद्धटपणा वाढला असून, त्यांना सत्तेतून हाकलून देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राजापुरात केली.केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविरोधात प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू असून, सहाव्या टप्प्यात तिचे कोकणात आगमन झाले. मंगळवारी यात्रा राजापुरात दाखल झाली.साडेचार वर्षांपूर्वी जनतेला मोठी आश्वासने देऊन भाजपाची सरकारे केंद्र व राज्यात सत्तेवर आली. मात्र, नंतर त्यांनी ज्या पध्दतीने कारभार केला ते पाहता ही सरकारे कशी अपयशी ठरली ते दिसून आले आहे. नोटाबंदी फसली, जीएसटी फसली, आज यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी सुखी नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. यांच्या राज्यात कुणीच सुरक्षित राहिलेला नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.
सत्तेच्या मस्तीतून भाजपात उद्धटपणा -अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:24 AM