चिपळूण : खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला. चिपळुणातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुरुनाथ पारशे हे दोन वर्षांपासून ग्रामसेवकांना तिरस्काराची वागणूक देत आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामसेवकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेले अनेक दिवस गटविकास अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामसेवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने खेड येथील गटविकास अधिकारी पारशे यांचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. पंचायत समितीच्या आढावा बैठकीत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष आर. एम. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. के. शिंदे, विकास देसाई, मंगेश पांचाळ, अनिता पाटील, मंगेश पिंगळे, पराग बांद्रे, संदीप कदम, जितेंद्र कांबळी, भरत पेटकर, सुप्रिया मालगुंडकर आदींसह तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.