शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

पावस बसस्थानकात काळोखाचे साम्राज्य

By admin | Published: July 22, 2014 9:48 PM

प्रवाशांना आरक्षण करणे अशक्य

पावस : पंचक्रोशीचा महत्त्वाचा दुवा अशी ओळख असणाऱ्या पावस येथील बसस्थानकातील विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने येथे गेल्या चार दिवसांपासून काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. येथील संगणकीय आरक्षण केंद्रही बंद असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण करणे अशक्य होत आहे.रत्नागिरीकडे येणाऱ्या सर्व बसेस पावसला थांबतात. राज्यातील विविध क्षेत्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी पावस हे पर्यटनस्थळ व तिर्थक्षेत्र म्हणऊन पसंतीस उतरलेले आहे. मात्र या ठिकाणी असणाऱ्या एसटीस्थानकात वीज गेल्याने हे स्थानक अंधारात राहिल्याने प्रवासी, पर्यटक यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास येत असलेलं पावस गाव पंचक्रोशीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. एस. टी.च्या या परिसरातील वाहतुकीचे नियंत्रण याच ठिकाणाहून होत असते. पावस बसस्थानकामध्ये असलेल्या नियंत्रण कक्षातून आंबोळगड, देवाचेगोठणे, आडिवरे, वेल्ये, हर्चे आदी गावातून मुंबई - परळ - बोरिवलीकडे जाणाऱ्या गाड्यांचे संगणकीय आरक्षण दिले जाते. मात्र, गेले चार दिवस स्थानकातील वीजपुरवठा खंडित असल्यामुळे ही सेवा ठप्प झाली आहे. पावसमधील महाविद्यालय दोन सत्रात चालविले जात असल्याने ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी विशेषत: युवती संध्याकाळी या स्थानकामध्ये येतात. चांदोर, नाखरे, डोर्ले - हर्चे, गणेशगुळे आदी गावात जाणाऱ्या संध्याकाळच्या फेऱ्या ७ नंतर या स्थानकात येत असतात. गेले चार दिवस वीज नसल्याने संध्याकाळी ६.३० नंतर स्थानकात काळोखाचे साम्राज्य पसरते. याचा फायदा रोडरोमिओ घेत असतात. नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता वाहतूक नियंत्रक गोगटे यांनी महावितरणकडे तक्रार करुन चार दिवस झाले तरी त्यांनी दखल घेतली नसल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी स्थानकात काळोखाचे साम्राज्य असल्याने अशा रोमिओपासून सुटका करुन घेण्यासाठी महाविद्यालयीन युवती आणि महिलांना शेजारच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)