लाेकमत न्यूज नेटवर्क
अडरे : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, अशपाक उल्लाह खान यांच्या ९०व्या शहीद दिनानिमित्त एस.एस.एम. हॉस्पिटल, चिपळूण यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला एकूण ३२ जणांनी रक्तदान केले.
सुरुवातीला जगदीश वाघुळदे यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, माजी मल्टिपल कॉउन्सिल चेअरमन अनिल देसाई, डॉ. परमेश्वर गोंड, वालावल रुग्णालयाच्या डॉ. नेहा पाटील, टेक्निकल सुपरवायझर रवि अग्रवाल, प्रीतम गवळी, जान्हवी घोरपडे, लिओ क्लब अध्यक्ष लि. प्रणव मेहता यांचे स्वागत केले.
यावेळी लडाख येथे कार्यरत असलेले सैनिक संकेत शिंदे यांनी रक्तदान करून कर्तव्य बजावले. शिबिरासाठी
एस.एम.एस हॉस्पिटलचे प्रथम शिंदे, संकेत साळवी व आरोग्य कर्मचारी यांनी मेहनत घेतली. रक्तदान करणाऱ्या सर्वांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.