रत्नागिरी : जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे.प्रतीक मोरे यांना बागेत फेरफटका मारत असताना माडाच्या झाडा शेजारी हे फुलपाखरू दिसले. माडाच्या बुंध्याला लागलेले हे पान हालचाल करत असल्याचे त्यांनी पाहिले. असं वेगळं पान कसं काय असेल ? अशा कुतूहलाने जवळ जाऊन त्यांनी पाहिलं, तर त्यांना हे फुलपाखरू दिसले. पंख मिटलेले असताना एखाद्या वाळलेल्या पानासारखे ते दिसत होते. पण वारा आल्यानंतर त्याच वाऱ्याबरोबर होणारी हालचाल सुद्धा पानासारखीच होती. इतकी हुबेहूब की एखाद्या भक्षकाला ते पानच वाटावं.ह्यनिंफलिडह्ण म्हणजेच ब्रश फुटेड या कुळात मोडणारे हे फुलपाखरू मुंबईपासून दक्षिण दिशेच्या पश्चिम घाटात प्रामुख्याने आढळून येते. याचे पावसाळी आणि उन्हाळी असे दोन प्रकारचे फॉर्म्स दिसून येतात. जसा आजूबाजूचा परिसर आपलं रुपड बदलतो, तसे हे फुलपाखरू देखील आपली रंगसंगती निसर्गाशी मिळतीजुळती होईल अशा पद्धतीने बदलते. याला शास्त्रीय भाषेत ह्यमिमिक्रीह्ण असे म्हणतात. मुख्यत: भक्षकांच्या नजरेस पडू नये आणि केमॉफ्लाज मिळवता यावा यासाठी अशा प्रकारचे बदल सजीव आपल्या शरीरात घडवून आणतात असे मोरे यांनी सांगितले.या फुलपाखराची मादी कारवी जातीच्या झाडांवर अंडी देते आणि म्हणूनच घाट, सह्याद्रीचे डोंगर, कडे, दाट झाडीची जंगलं अशा ठिकाणी ही वनस्पती पर्यायाने हे फुलपाखरू सुद्धा प्रामुख्याने दिसून येतं. अशी विविधतेने नटलेली आपली सह्याद्रीची जंगलं किती वैशिष्ट्य पूर्ण आहेत त्याचा हा अजून एक ढळढळीत पुरावा असल्याचे प्रतीक मोरे यांनी सांगितले.
देवरूखात आढळले नीलपर्ण जातीचे फुलपाखरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 1:22 PM
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे.
ठळक मुद्दे प्रतीक मोरे यांच्या घराजवळ उद्यान वाळलेल्या पानासारखे दिसणारे फुलपाखरू