रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी लाखो रुपयांची रक्कम ॲडव्हान्स घेऊनही अनेक नौकांवरील खलाशी अजूनही परतलेले नाहीत. त्यामुळे नौका मालक अडचणीत आले आहेत.आज मच्छिमारांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सर्वात मोठी अडचण ही आर्थिक असली तरी आता खलाशांचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारीनंतर पर्ससीन नेटने मासेमारी करणे बंदी घालण्यात आल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे किनारपट्टीवरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. त्याचा परिणाम इतरही संबंधित व्यवसायांवर झाला होता. खलाशांअभावी अशीच परिस्थिती राहिल्यास या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे़मासेमारी १ ऑगस्टपासून सुरु झाली असली तरी अनेक खलाशी अडीच महिने उलटले तरी ते परतलेले नाहीत. तसेच मासेमारी सुरु झाल्यानंतर वातावरणातील बदलामुळे मासेमारी बंद ठेवावी लागत आहे. अनेक नौका आज नांगरावर आहेत. लाखो रुपये ॲडव्हान्स देऊनही खलाशी न आल्याने नौका मालक अडचणीत सापडले आहेत. नौका मालकांकडे नवीन खलाशांना देण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे.नौकामालक अडचणीतसहा महिने खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली होती. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने अनेक खलाशांनी पलायनही केले होते. त्यांना दिलेला ॲडव्हान्स नौका मालकांना त्यांच्याकडून वसूल करता आलेला नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत.
खलाशांअभावी अजून नौका बंदच, परप्रांतातील खलाशी बेपत्ताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 2:09 PM
CoronaVirus, boat, ratnagirinews, Mirkarwada Bandar कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी लाखो रुपयांची रक्कम ॲडव्हान्स घेऊनही अनेक नौकांवरील खलाशी अजूनही परतलेले नाहीत. त्यामुळे नौका मालक अडचणीत आले आहेत.
ठळक मुद्देखलाशांअभावी अजून नौका बंदच, परप्रांतातील खलाशी बेपत्ताच कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प