शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बोअरवेलचे पाणी थांबता थांबेना, जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा, लोकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 1:19 PM

Water Chiplun Ratnagiri-एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करू लागले आहेत.

ठळक मुद्देजमिनीतून पाण्याचा मोठा फवारा पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी

असुर्डे /चिपळूण : एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करू लागले आहेत.हिंदू धर्म शास्त्रानुसार जलाची पूजा केली जाते. लाखो रुपये खर्च करूनही ते मिळत नाही. सध्याच्या दिवसात तर चांगले चांगले स्रोत आटून जातात. परंतु कोकरे येथील संजय व मनोज पर्शराम दळवी यांच्या बादी येथील शेत जमिनीने मात्र कमालच केली आहे.

तेथे खोदलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा ओघ काही केल्या थांबत नाही. या शेत जमिनीत झाडांची लागवड केली आहे. ती अतितीव्र उष्णतेमुळे सुकून जात होती. यासाठी या भावांनी बोअरवेल पाडण्याचा निर्णय घेतला. अखेर मंगळवारी रात्री २० फुटापर्यंत बुरूम माती तर १५० फुटापर्यंत कातळ लागला.त्यानंतर १७० फुटापर्यंत बोअरवेलचे खोदकाम करण्यात करून ७ इंच पाईप टाकण्यात आला. परंतु रात्री ११ वाजल्यापासून अद्याप ७ इंच पाईप सातत्याने ओसंडून वाहत आहे. हे पाणी बाहेर जाऊ नये. म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु सर्व उपाय व्यर्थ ठरले आहेत. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात भूजल पातळी खाली जाते. परंतु इथे मात्र पाणी भरभरून वाहत आहे.

लोकांना जमिनीतील पाणी वर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. परंतु इथे मात्र हा स्रोत आता थांबविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भूगर्भतज्ज्ञांनाही बोलावले जाणार आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे हे पाणी गरम आहे. त्यामुळे हे गंधकाचे पाणी आहे, असा अनेक जण दावा करीत आहे. काही जणांनी पाण्याची चव घेतली असता सर्वसाधारण पिण्याच्या पाण्याची चव आहे.बोअरवेलच्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की जवळच असलेल्या नदीत हा प्रवाह जात असल्यामुळे सुकलेल्यानदीत पाणीच पाणी दिसत आहे. यामुळे भुगर्भातील जलाशयाची पातळी, आजूबाजूच्या पाण्याचे स्रोत यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.

टॅग्स :WaterपाणीChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरी