देव्हारे : देव्हारे (ता. मंडणगड) परिसरात बोटूलिझम रोगाने सुमारे आठ जनावरे दगावली आहेत. ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.या रोगाची लागण होऊन आतापर्यंत आठ जनावरे दगावली आहेत. बोटूलिझम हा रोग एवढा भयंकर आहे की, त्याची लागण झालेला प्राणी काही दिवसांतच प्राण सोडतो. या रोगाची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणावर लाळ सांडली जाते. मात्र, अजूनही या भयंकर रोगावर लस उपलब्ध न झाल्याने डॉक्टरांकडूनही कोणतेच उपचार मिळत नाहीत. मात्र, या रोगावर प्रतिबंध करायचा झाल्यास मृत पावलेल्या जनावरांना खड्डा खेदून पुरून टाकावे, अशी माहिती देव्हारे येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री पवार यांनी शेतकऱ्यांना दिली. मात्र, परिसरामधे परसलेल्या या भयंकर रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र आपल्या पशुधनाबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथे बोटुलिझम रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
बोटुलिझम रोगाने आठ जनावरांचा मृत्य
By admin | Published: January 01, 2015 10:14 PM