शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींची उज्ज्वल कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:37 AM

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती १५ ऑगस्ट रोजी "ओडीएफ ...

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती १५ ऑगस्ट रोजी "ओडीएफ प्लस" (अधिक हागणदारीमुक्त) म्हणून घोषित झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. मरभळ यांनी दिली.

सन २०१८ मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. त्यामुळे मंडणगड तालुक्‍यातील सोवेली ग्रापपंचायत, दापोली तालुक्‍यातील देहेण-तुरवडे ग्रातपंचायत, चिखलगाव ग्रामपंचायत, खेड तालुक्‍यातील भिलारेआयनी ग्रामपंचायत, चिपळूण तालुक्‍यातील मोरवणे खुर्द ग्रामपंचायत, गुहागर तालुक्‍यातील काताळवाडी - अंजनवेल ग्रामपंचायत, रत्नागिरी तालुक्‍यातील चक्रदेव- मेर्वी ग्रामपंचायत तसेच संगमेश्‍वर तालुक्‍यातील सागवे ग्रामपंचायत अशा ८ ग्रामपंचायती ‘ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित करण्यात आल्या.

राज्य शासनाच्या मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन, गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृश्यमान स्थिती, सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणची सुविधा (शौचालय, पाण्याची सुविधा), घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन, माहिती शिक्षण व संवाद, चित्रमय संदेश या निकषाची पूर्तता करून ग्रामपंचायती ओडीएफ प्लस केल्या गेल्या आहेत. अधिक हागणदारीमुक्त गाव असे त्यांना संबोधले जाते.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या निकषांची उत्स्फूर्तपणे पूर्तता करून स्वच्छता शाश्‍वत ठेवावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ए. बी. मरभळ यांनी केले आहे.