अडरे : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या एनएनएमएस (राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा) परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले.
या परीक्षेत विद्यालयातील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. यामध्ये वेदांत हरिश्चंद्र पेवेकर, सिद्धांत सचिन कदम, ओंकार गणेश बैकर, नक्षत्रा गणेश कदम, श्रेया संजय वाजे, श्रुती संदीप मनवल, साईदास संदीप राजेशिर्के यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे चार वर्षांकरिता ४८ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, पर्यवेक्षक विलास चोरगे, अमर भाट यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करून, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.