देवरुख : संगमेश्वर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेच्या विजयाची परंपरा किती वर्षांची आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मात्र त्याला थोडे गालबोट लागले. मात्र, गेलेले हे वैभव परत खेचून आणू, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी देवरुख येथे केले.
देवरूखातील सभापती निवास येथे आयाेजित कार्यक्रमात रवींद्र माने बोलत होते. रवींद्र माने या वेळी सदानंद चव्हाण यांना उद्देशून म्हणाले की, आता येथून खऱ्या अर्थाने राजकीय वाटचाल जोमाने सुरू होते. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सक्रिय राहा, असा सल्ला माने यांनी दिला. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार सदानंद चव्हाण, सभापती जयसिंग माने, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला संघटक स्नेहा माने, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, उपतालुकाप्रमुख शैलेश जाधव, जिल्हा संघटक वेदा फडके, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, मुग्धा जागुष्टे, पंचायत समिती सदस्य सारिका जाधव, शीतल करंबेळे, संतोष लाड, बबन बांडागळे, प्रसाद सावंत, मुन्ना थरवळ, प्रद्युम्न माने, साडवली सरपंच राजू जाधव, कोसुंबचे सरपंच पूजा बोथरे उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण म्हणाले की, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण मागील झालेल्या माझ्या पराभवाची हानी भरून काढू. या निवडणुकांत विजयी झेंडा फडकवू हीच खरी विधानसभा निवडणुकीची नांदी असेल. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागा, असे स्पष्ट केले. यश आपलेच आहे, असाही आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
240921\img-20210923-wa0075.jpg
फोटो: देवरुख सभापती निवासस्थानी कार्यक्रमात बोलताना माजी आमदार सदांनद चव्हाण , सोबत माजी राज्यमंत्री रवींद्र माने। (छाया-सचिन मोहिते)