रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा निवडणुका स्वतंत्र लढणार, हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार असून, ओबीसी बांधवांना एकत्र आणणार असल्याचे सूतोवाच ओबीसी सेलचे राज्याध्यक्ष भानुदास माळी यांनी काँग्रेस भवन कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्याध्यक्ष भानुदास माळी बुधवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मच्छीमार बांधवांच्या व्यथा ऐकून घेतल्या. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना ओबीसी आरक्षणासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. विजय भोसले, आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, नवीनचंद्र बांदिवडेकर, प्रदेश महिला सरचिटणीस रुपाली सावंत, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, जिल्हा सरचिटणीस दीपक राऊत, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, जिल्हा चिटणीस अशफाक काद्री, जिल्हा चिटणीस सी. ए. जाधव, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख, प्रमोद सक्रे, युवकचे दर्शन सक्रे, महिला शहर उपाध्यक्ष अलमास मोतींन मोगल, शैलेश विश्वासराव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.