शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

बीएसएनएलची कामगार कपात

By admin | Published: May 27, 2016 10:38 PM

संगमेश्वरातील प्रकार : महाप्रबंधकांचा निर्णय अन्यायकारक; सर्वपक्षीय नेते एकवटणार

आरवली : भारत संचार निगमच्या संगमेश्वर कार्यालयातील कामगार कमी केल्याने या कार्यालयाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहक सेवेवर होत आहे. संगमेश्वर कार्यालयांतर्गत विस्तारलेल्या सेवा आणि भौगोलिक परिस्थिती याचा विचार न करताच अचानक कामगार कमी केल्याने या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. संगमेश्वरमधील बीएसएनएलच्या कारभाराबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी दखल घेतली असून, याबाबत महाप्रबंधकांना जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या बीएसएनएलच्या संगमेश्वर कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. संगमेश्वरचे कार्यालयाच्या कामगार कपातीच्या आडमुठ्या धोरणामुळे याचा परिणाम थेट ग्राहक सेवेवर होत आहे. या कार्यालयांतर्गत आठ दूरध्वनी केंद्र चालतात. त्यामध्ये आंबेड, पोचरी, फुणगूस, करजुवे, माखजन, आरवली, कडवई, नायरी यांचा समावेश आहे. दूरच्या अंतरावर असणारी दूरध्वनी केंद्र आणि या केंद्रांचा कार्यभार केवळ पाच लाईनमन सांभाळत आहेत. त्यामुळे या लाईनमनची दमछाक होताना दिसत आहे.या कार्यालयांतर्गत उपळे, वांद्री, साखळकोंड, आंबेड, नायरी, कडवई , बुरंबी, माखजन, आरवली, आदी ठिकाणी मोबाईल टॉवर कार्यरत आहेत. हे सर्व मोबाईल टॉवर सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहेत. हा सर्व कार्यभार पाच लाईनमन यांच्यासोबत युनिटच्या माध्यमातून काम करणारे कंत्राटी कामगार व्यवस्थितरित्या सांभाळत होते. मात्र, नव्याने कार्यभार हाती घेतलेल्या महाप्रबंधकांनी कामगार कपातीचे धोरण अवलंबले आहे. यामुळे या कामगारांची उपासमार होत असून, याचा जास्त फटका ग्राहकवर्गाला बसत आहे. संगमेश्वर येथील बीएसएनएल कार्यालय हे नेहमी गजबजलेले असते. मात्र, गेले महिनाभर या कार्यालयातील वर्दळ मंदावली आहे. संगमेश्वर ग्राहक सेवा केंद्र येथे एस.आर.टी.ओ.ए यांच्या मदतीकरिता असणारे कंत्राटी कामगार कमी केल्यामुळे सीमकार्ड विक्री, टॉप-अप, कार्ड रिप्लेसमेंटचे व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. संगमेश्वर कार्यालयात सुरू असणारा सी.एस.सी विभाग पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहेत. संबंधित कामगारांचे कंत्राट संपले असेल तर त्याच कंत्राटदारदाराच्या अंतर्गत काम करणारे देवरुख कार्यालयातील कामगार कामावर कसे? हा प्रश्नदेखील अनुत्तरीत आहे. भविष्यात जर भारत संचार निगममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणात बदल झाला नाही तर ग्राहक विरुध्द अधिकारी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)राजकीय नेते सरसावले : महाप्रबंधकांना कपातीबाबत जाब विचारणारसंगमेश्वर परिसरातील विविध राजकीय पक्षांचे नेते सध्या सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर या कार्यालयातील कारभार सुरळीत सुरू झाला नाही तर याचा जाब महाप्रबंधकांना सर्वपक्षीय पदाधिकारी विचारणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कामगार कपातीचा सेवेवर झालेला परिणाम व त्यामुळे ग्राहक वर्गाची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी संगमेश्वर येथील एका बड्या नेत्याने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजनही केले आहे. त्यामुळे संगमेश्वरातील दूरध्वनी कार्यालयात सुरू असलेल्या घडामोडींमुळे नवा संघर्ष उभा राहण्याची भीती आहे.