लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यातील वेरळ रेल्वे स्थानकाजवळील बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील ३ लाख ५० हजार रुपयाच्या रोकडसह १० हजार रुपये किमतीचा एल.सी.डी. टीव्ही चोरट्याने लांबवल्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
याबाबत गजानन गोविंद कदम (मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार, ते घर बंद करून पुरेबुद्रुक येथे गेले होते. बंद घराचा दर्शनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोकडसह टीव्ही लंपास केला. ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते ११ जुलै रोजी सकाळी ११.३० या वेळेत घडल्याचे म्हटले आहे. त्यानुसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे अधिक तपास करत आहेत.