चिपळूण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व माजी खासदार भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यावरील टीकेला चिपळूण भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजप संपर्क कार्यालयासमोर दहन करून शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर भाजप नेते व राणे कुटुंबीयांवर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपने दिला आहे.खासदार विनायक राऊत व सेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी खासदार नारायण राणे तसेच नीलेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला चिपळूण भाजपने मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. निदर्शने करताना भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेवक अशिष खातू, नगरसेवक परिमल भोसले, भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, सरचिटणीस वसंत ताम्हणकर, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक निशिकांत भोजने, नगरसेविका नूपुर बाचीम, भाजप युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष मालप, कुंदन खातू, सचिन चाळके, संदेश भालेकर, प्रणय वाडकर, शुभम पिसे, प्रफुल्ल पिसे, गणेश नलावडे, शरद तेवरे, महेश दीक्षित, महेश कांबळी, अभिषेक जागुष्टे, मंदार कदम, उल्हास भोसले, सुधीर पानकर, राजेश शेटे, रोहित हटकर, श्रीराम शिंदे, राकेश घोरपडे, अमित ओतारी, जतीन घटे आदी उपस्थित होते.
खासदारांच्या पुतळ्याचे चिपळुणात दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 1:42 PM
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व माजी खासदार भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यावरील टीकेला चिपळूण Chiplun Bjp Ratnagrinews- भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजप संपर्क कार्यालयासमोर दहन करून शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर भाजप नेते व राणे कुटुंबीयांवर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपने दिला आहे.
ठळक मुद्देखासदारांच्या पुतळ्याचे चिपळुणात दहनजशास तसे उत्तर देऊ, भाजपने दिला इशारा