दापोली : एकाच अपघातात एकाचवेळी तब्बल ३० सहकारी गमावलेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठावर आज सोमवारी अवकळाच पसरली होती. दोन दिवसाच्या सुट्टीत खूप काही घडलं आणि त्याने विद्यापीठातील प्रत्येकाचे मन हादरले. आज विद्यापीठाचे कामकाज सुरू होताना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काम सुरू होताना प्रत्येकजण अस्वस्थच आहे.पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात शनिवारी कृषी विद्यापीठाची बस ८०० फूट खोल दरीत कोसळली आणि ३० जणांचा बळी गेला. कृषी विद्यापीठातील कर्मचारी सहलीसाठी महाबळेश्वरकडे जात होते. या अपघातामुळे केवळ प्रकाश सावंतदेसाई यांचाच जीव वाचला. या दुर्घटनेचा धसका साऱ्यांनीच घेतला आहे. कोणीही आवाहन न करताही शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस दापोली बाजारपेठ बंद होती.दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारी विद्यापीठ सुरू झाले. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या मृत सहकाना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सर्वजण आपल्या कामाकडे वळले खरे. मात्र आपल्या शेजारचा कर्मचारी आता हयातच नाही, यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसलेला नाही. प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यावर या दुर्घटनेचा परिणाम दिसत होता.
Bus Accident : दापोली कृषी विद्यापीठावर अवकळा, परिसरात सर्वांनी वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 3:23 PM
एकाच अपघातात एकाचवेळी तब्बल ३० सहकारी गमावलेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठावर आज सोमवारी अवकळाच पसरली होती. दोन दिवसाच्या सुट्टीत खूप काही घडलं आणि त्याने विद्यापीठातील प्रत्येकाचे मन हादरले. आज विद्यापीठाचे कामकाज सुरू होताना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काम सुरू होताना प्रत्येकजण अस्वस्थच आहे.
ठळक मुद्देदापोली कृषी विद्यापीठावर अवकळापरिसरात सर्वांनी वाहिली श्रद्धांजली