रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख - साखरपा मार्गावरील वांझोळेनजीक आरामबस उलटल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात अनेकांना किरकोळ, गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. यामध्ये १८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही आरामबस देवगडहून मुंबईच्या दिशेने जात होती. गंभीर जखमींना रत्नागिरीत तर किरकोळ जखमींना देवरूख व साखरपा येथे उपचारासाठी केले दाखल करण्यात आले आहे.
देवरूख- साखरपा मार्गावरील वांझोळे येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि आरामबस उलटली. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिस तातडीने दाखल झाले आहेत. पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालय व साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अद्याप जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.