लांजा : ठेकेदार पद्धतीने भरती करण्यात आलेल्या चालक - वाहक यांचा गेली चार महिने प्रशासनाने वेतन न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. सकाळी ७ वाजल्यापासून सुटणाऱ्या सर्व गाड्या रोखून धरण्यात आल्या होत्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष यांनी लांजा आगारप्रमुखांना कर्मचारी यांचे वेतन देण्याबाबत पत्र दिले होते. तसेच वेतन रविवारीपर्यंत न देण्यात आल्यास सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे मोजकेच कार्यकर्ते बसस्थानकातू सुटणाऱ्या एस्. टी. सकाळी १० वाजेपर्यंत रोखून धरल्याने त्यानंतर आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आंदोलन मागे घेतले.सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत एस्. टी. च्या बसफेऱ्या रोखून धरल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल झाले होते.