शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Video: ... पण प्रत्यक्षात हे 'पवार सरकार', शिवसेना खासदाराचाच महाविकास आघाडीवर वार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:26 AM

शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनीही रायगड जिल्ह्यात एका सभेत यापूर्वी महाविकास आघाडीवर टीका केली होती

रत्नागिरी/दापोली : केवळ “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार” असे म्हणत शिवसेनेचे मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना खासदारानेच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभात खा. किर्तीकर बोलत होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नगरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.

शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनीही रायगड जिल्ह्यात एका सभेत यापूर्वी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनीही आता महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केल्याने या आघाडीत सर्वच आलबेल नाही, असे दिसून येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांना, त्यानंतर कॉग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना व सर्वात शेवटी अर्थसंकल्पातील केवळ १६ टक्के निधी शिवसेनेच्या मंत्र्याच्या खात्यांना मिळाल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. दरम्यान, या कार्यक्रमात खा. किर्तीकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम यांचा सत्कारही करण्यात आला. ते म्हणाले कि अंतर्गत भेदीही खूप आहेत त्यांचाही त्रास होतो, हा त्रास मुंबई शहरात एवढा होत नाही. मात्र इकडे जास्त आहे, असे म्हणत तुला ते भोगायला लागत आहे, असे त्यांनी आ. योगेश कदम यांना सांगितले व आपण तुझ्या पाठीशी आहोत, असा धीरही त्यांनी आमदार योगेश कदम यांना दिला. 

आ. योगेश कदमांना पक्षांतर्गत विरोध

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाइलवरील कथित संभाषण उघड झाल्यावर शिवसेनेतून रामदास कदम व त्यांचे पुत्र आ. योगेश कदम यांना कॉर्नेर करण्याचा प्रयत्न केला जात असून दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार आ. योगेश कदम यांना न देता ते माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना देण्यात आले होते. तसेच योगेश कदम यांच्या गटाचे असलेले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, विधासभा क्षेत्र प्रमुख यांची उचलबांगडी करून तेथे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती. त्यामुळे आ. योगेश कदम यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGajanan Kirtikarगजानन कीर्तीकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार