शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका

By admin | Published: March 19, 2015 10:09 PM

रणशिंग : २२६ रिक्त जागांकडे लक्ष

रत्नागिरी : मे ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील विविध प्रवर्गातील रिक्त होणाऱ्या ९० ग्रामपंचायतींच्या २२६ रिक्त जागांसाठी १२३ प्रभागांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.जिल्ह्यात एकूण ८४७ ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ४७२ ग्रामपंचायतीच्या मुदती संपत असल्याने त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध कारणांनी रिक्त झालेली पदे भरण्यासाठी २२० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. यांपैकी आता ९० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका निश्चित झाल्या आहेत.या ग्रामपंचायतीत विविध प्रवर्गातील काही जागा मे ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत रिक्त होणार आहेत. त्यासाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या ९० ग्रामपंचायतीच्या एकूण १२३ प्रभागातील एकूण २२६ सदस्यांसाठी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आता लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. या ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका होणार असल्याने रिक्त झालेल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी आता सर्व पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या जागांसाठी उमेदवार उभे करणे सर्वच पक्षांकडून प्रतिष्ठेचे केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात या ग्रामपंचायत पोटनिवडणुका चांगल्याच गाजणार आहेत. (प्रतिनिधी)मे ते आॅगस्टमध्ये निवडणुका मंडणगड(०४/ ७)घराडी, पडवे, मुरादपूर, तोंडली.दापोली(०९/१३)सोंडेघर, बांधतिवरे, कांगवई, भोमडी, वेळवी, भडवळे, डवली, मांदिवली, फणसू.खेड(१०/१६)सुसेरी, वडगाव, रजवेल, चौगुले मोहल्ला, सवणसखुर्द, अलसुरे, खोपी, सवणस, आस्तान, दिवाणखवटी.चिपळूण(१५/२१)दोणवली, डेरवण, ढाकमोली, गोंधळे, कालुस्ते बुद्रुक, कालुस्ते खुर्द, केतकी, नारदखेरकी, पोफळी, देवखेरकी, डुगवे, खांडोत्री, गाने, निर्व्हाळ, रावळगाव.गुहागर(०७/११)आंबेरे खुर्द, पाली, पाचेरी आगार, वरवेली, वेलदूर, झोंबडी, मढाळ.संगमेश्वर(१८/२६)शेंबवणे, कुंडी, तांबेडी, पोचरी, मुचरी, कासे, कुळे, राजिवली, माखजन, असुर्डे, गुरववाडी, शिरंबे, पाटगाव, पुर्ये तर्फ सावर्डा, सरंद, फणसट, किरडुवे, मावळंगे, कळंबुशी.रत्नागिरी(०३/५)बोंड्ये, पुर्णगड, कुवारबाव. $$््िलांजा(१३/१९)झापडे, कुर्णे, बेनीबुद्रुक, शिरवली, कोंडगे, कोंड्ये, कुरचुंब, खानवली, सालपे, कोर्ले, कोलधे, रिंगणे, वाघ्रट.राजापूूर(११/१७)कोळवणखडी, कोतापूर, देवाचे गोठणे, कोंड्ये तर्फ सांैदळ, आंगले, खरवते, परूळे, मोगरे, वडदहसोळ, साखरीनाटे, वडवली.