शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

प्रवाशांसाठी ‘कॅटकार्ड’ ठरतेय ‘बचत कार्ड

By admin | Published: August 24, 2016 10:35 PM

रत्नागिरी विभाग : एस. टी.च्या योजनेला वाढता प्रतिसाद

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. प्रवाशांसाठी अठरा किलोमीटरच्या पुढे प्रवास करणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत कॅट कार्ड देण्यात येते. कॅटकार्डधारक प्रवाशाला दीड लाखाची विमा सवलत देण्यात येते. गेल्या नऊ वर्षामध्ये रत्नागिरी विभागातील २२ हजार ३२७ प्रवाशांनी याचा लाभ घेतला, त्यामुळे विभागास ४ कोटी ४५ लाख ४ हजार रूपयांचा लाभ मिळाला आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २००३ साली कॅटकार्ड सुविधा सुरू केली. मात्र, त्यावेळी फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. परंतु सन २००८नंतर कॅटकार्ड खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला तरी गेल्या दोन वर्षात वापरामध्ये पुन्हा घसरण झाली आहे. एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक, त्रैमासिक पास सवलतीच्या दरात वितरीत करण्यात येतो. महाराष्ट्रभर फिरण्यासाठी आवडेल तेथे प्रवास योजना सुरू आहे. चार ते सात दिवसांच्या प्रवास योजनेसाठीही प्रवाशांचा लाभ मिळत आहे.२००३पासून महामंडळाने कॅटकार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला १८ किलोमीटरच्या प्रवासापुढे दहा टक्के सवलत देण्यात येते. शिवाय प्रवाशाला दीड लाखाचे विमा संरक्षणही देण्यात येते. कॅटकार्ड २०० रूपये भरून प्रवाशाला वितरीत करण्यात येत आहे.कॅटकार्डधारक प्रवाशाच्या एस. टी.ला अपघात झाल्यास राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून तीन लाखाचे अर्थसहाय्य तसेच दीड लाख विमा परतावा मिळत असल्याने कॅटकार्डसाठी ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. गेल्या नऊ वर्षामध्ये रत्नागिरी विभागातील २२ हजार ३२७ प्रवाशांनी याचा लाभ घेतला होता. त्याद्वारे विभागाला ४ कोटी ४५ लाख ४ हजार रूपयांचे उत्पन्न लाभले. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कॅटकार्ड फायदेशीर ठरत आहे. अठरा किलोमीटरच्या पुढील प्रवासाला दहा टक्के सवलत मिळत असल्याने तिकीट खर्चात बचत होते. शिवाय दीड लाखाचा प्रवासी संरक्षित विमा असल्याने त्याचाही लाभ होतो. परंतु गेल्या दोन वर्षात कॅटकार्डचा वापर पुन्हा कमी झाला आहे. (प्रतिनिधी)सन २००८मध्ये १३९४ कॅटकार्डची विक्री झाली. २००९ मध्ये १४२६, २०१०मध्ये १५९४, २०११मध्ये २०२५, २०१२मध्ये २७६४, २०१३मध्ये २८७८, २०१४मध्ये ३६८७, २०१५मध्ये ११४१, तर एप्रिल ते जुलै २०१६ अखेर ११८६ प्रवाशांनी कॅटकार्ड विकत घेतली.