खेड : संचारबंदीचे सारे नियम पायदळी तुडवत प्रेयसीला भेटण्यासाठी नवी मुंबई (पनवेल) येथून दुचाकीने गुहागरला निघालेल्या प्रियकराला खेड पोलिसांनी कशेडी टॅप येथे अडवून माघारी धाडले. लॉकडाऊनमुळे गुहागरमध्ये अडकून पडलेल्या प्रेयसीचा विरह सहन होत नसल्याने आपण ही जोखीम पत्करली असे या प्रेमवेड्या प्रियकराने पोलिसांना सांगितले. १४ दिवस क्वॉरंटाईन करून ठेवण्याची तंबी देताच हा प्रियकर नाराज होऊन माघारी परतला.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातच थांबा, घराबाहेर पडू नका, असे पोलीस प्रशासन आवाहन करीत आहे. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला ह्यआव्हानह्ण देत काही मजनू आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्याचें धाडस करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका प्रियकराला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेयसीसोबत लांजा पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वॉरंटाईन केले होते. ही बातमी ताजी असतानाच जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना गुहागरात भेटायला चाललेल्या पनवेल येथील प्रियकराला समज देऊन परत पाठवावे लागले.संचारबंदी काळात वाहन चालविण्याच्या विशेष परवान्याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांने आपल्याकडे अशा प्रकारचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता ह्यआपण पनवेल येथून आलो असून, आपल्याला गुहागरला जायचे आहेह्ण, असे त्याने पोलिसांना सांगितले. गुहागरला जाण्याचे योग्य असे काही कारण आहे का? पोलिसांच्या प्रश्नाला त्याने दिलेल्या उत्तराने पोलीसही चक्रावले.तो म्हणाला, लॉकडाऊनमुळे माझी प्रेयसी गुहागरमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस तिला पाहता, भेटता आलेले नाही. ३ तारखेला लॉकडाऊन संपेल असे वाटले होते मात्र लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. साहजिकच मी १७ तारखेपर्यंत तिला भेटू शकत नाही. हा विरह आता सहन होण्यापलिकडचा असल्याने मी तिला भेटण्यासाठी गुहागरला निघालो आहे, असे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी क्वॉरंटाईन व्हावे लागेल असे सांगताच तो माघारी परतला.
प्रेयसीला भेटण्यासाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 3:44 PM
हा विरह आता सहन होण्यापलिकडचा असल्याने मी तिला भेटण्यासाठी गुहागरला निघालो आहे, असे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी क्वॉरंटाईन व्हावे लागेल असे सांगताच तो माघारी परतला.
ठळक मुद्देमुंबईवरून आलेल्या प्रियकराला खेडमध्ये अडविले गुहागरमध्ये प्रेयसी लॉकडाऊनक्वॉरंटाईनच्या धास्तीने न भेटताच माघारी