रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथे नादुरुस्त बोटींच्यापाठीमागे गांजाचे सेवन व जवळ बागळल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार २४ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याचा सुमारास घडली. अनिल भागुराम चौधरी (२२, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.
सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे शनिवारी दुपारी शहर पोलिसांचे पथक मिरकरवाडा येथे गस्त घालत होते. तेव्हा तेथील एका नादुरुस्त बोटीच्या आडोशाला अनिल चौधरी हा गांजा बाळगून त्याचे सेवन करीत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दोनशे रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल घोरपडे यांनी पोलीस स्थानकात तक्रारी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.