शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

दोन जिवंत काडतुसांसह रोख ऐवजही हस्तगत

By admin | Published: July 16, 2014 11:22 PM

रत्नागिरीतील घटना :

रत्नागिरी : परदेशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या रिक्षाचालकास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. परवेज इरफान सय्यद (वय ४४, रा. नाईकनगर, महालक्ष्मी मंदिरासमोर, खेडशी, रत्नागिरी) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडील एक लाख रुपये कि मतीच्या पिस्तुलासह एक लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.सय्यद याने हे पिस्तूल विक्रीसाठी आणल्याचे मान्य केले; परंतु कोणास विक्री करणार याबाबत मात्र त्याने मौन पाळले आहे. सय्यद शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. एक रिक्षा शहरातील आठवडा बाजार येथील संगीता लॉजसमोर संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्या रिक्षावाल्यास थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अमेरिकन बनावटीचे एक लाख रुपये किमतीचे पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्या ताब्यातील रिक्षासह (एमएच ०८ इ ६२५१) सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला. सय्यदवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. (प्रतिनिधी)पिस्तूल आणले बिहारमधून ?रत्नागिरीत काहीजण उत्तर प्रदेश व बिहारमधून बेकायदा पिस्तुलासारखी शस्त्रे विक्रीसाठी आणत असून, अशी पिस्तुले कोणी खरेदी केली आहेत का, याची माहिती आता पोलीस घेत आहेत. सय्यदकडे मिळालेले पिस्तूलही बिहारमधून आणले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.‘गेम’ करण्याचा बेत?सय्यद याच्याकडे केवळ पिस्तूलच नव्हे, तर त्याच्याकडे जिवंत काडतुसेही सापडली आहेत. त्यामुळे तो कोणाच्या सांगण्यावरून ‘गेम’ करण्यासाठी, तर आला नाही ना, असा संशयही व्यक्त होत आहे. पोलीस सर्व स्तरांवर याप्रकरणी तपास करीत आहेत.