रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे वडाचे झाड कारवर कोसळून कारचा चक्काचूर झाला. अतिवृष्टीमुळे हा वड उन्मळून पडला. गावखडी येथील केतन तोडणकर यांची कार वडाखाली उभी करून ठेवलेली होती.
पर्यायी मार्ग काढा
देवरुख : देवरूख शहरातील खालची आळी येथील सारण बंद केल्याने गेले आठ दिवस मार्गावर पाणी साठले होते. या प्रकाराची दखल घेऊन आमदार शेखर निकम यांनी या मार्गाची पाहणी केली. पर्यायी मार्ग काढावा अशा सूचनाही स्थानिक प्रशासनाला केल्या.
आमदार निधीतून लसीकरण
रत्नागिरी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वत:च्या आमदार निधीतून १८ ते २९ वर्ष या वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात २७ जून पासून या लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. यासाठी मुंबईतून टीम येणार आहे.
सभापतींचे योगदान
रत्नागिरी: जिल्ह्यात २९ अनुदानित वसतिगृह आहेत. त्यात १३५ कर्मचारी मानधन तत्वावर भरले जातात. गेली सहा महिने त्यांना मानधन मिळाले नव्हते. ही बाब समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी अध्यक्ष व सर्व सदस्यांच्या कानावर घातली व त्यांचे मानधन जुलैपासून दरमहा करण्याचा निर्णय घेतला आहे.