फुणगूस : दिवाळी म्हणजे तेजाची पुजा, मांगल्याची निर्मल बरसात! मानवी भावबंध जोडणाऱ्या संस्कृ तीचा भक्कम पूल, केवळ पणत्यांची आरास म्हणजे दिवाळी नाही तर या सणामागचा दिव्य शुभ संदेश प्रत्येकाला देण्याचे एक माध्यम आहे. परंतु सध्या मोबाईलचे युग असल्यामुळे ग्रीटींग कार्डऐवजी मोबाईल इंटरनेटवरुन ‘एसएमएस’ केले जातात. साहजिकच भेडकाडर््सचा जमानाच आता संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळे पूर्वी हजारोंच्या संख्येने पोस्टामार्फ त दाखल होणारी भेटकाडर््स आता शेकडोवर येऊन पोहोचली आहे.दिवाळीचा सण तोच. आनंदही तोच आहे. मात्र, काळानुरुप साजरा करण्याच्या प्रथा बदलल्या आहेत. आनंदाची परिमाणे बदलली. मात्र, आनंद वेगवेगळ्या प्रथा परंपरेनुसार साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. मात्र, सणांचे औत्सुक्य आणि उत्साह तोच आहे. या सणानिमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात तेजाची, मांगल्याची पहाट उगवावी, यासाठी एकमेकांना शुभ संदेश पाठवण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. व्यापारी आपल्या ग्राहकांना, मित्र आपल्या मैत्रिणींना, नातेवाइक आपल्या नातेवाइकांना भेटकार्डच्या स्वरुपात आपला संदेश पोहोचवतात. मात्र, सध्या मोबाईलचे युग आल्यामुळे एसएमएसद्वारे अथवा व्हॉटस्अॅप, फेसबुक मॅसेंजरद्वारे संदेश पाठविण्यावरच सर्वांचा भर आहे. त्यामुळे भेटकार्ड पडद्याआड गेली आहेत. सध्या पोस्ट कर्मचाऱ्यांचीही धावपळ वाचली आहे. बाजारात भेटकार्ड आकर्षक स्वरुपात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, त्यांना मागणी कमी असल्याने भेटकाडर््सच्या किमतीही कमी ठेवण्यात आल्या होत्या. तरीही इंटरनेट व मोबाईल एसएमएसकडे लोकांचा कल असल्याने दिवाळीसाठीची भेटकार्ड लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. (वार्ताहर)
भेटकार्ड्सचं माध्यम झालं दुर्मीळ
By admin | Published: October 27, 2014 9:04 PM