शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

कशेडी घाटात टँकरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:09 AM

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत कशेडी घाटामध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टँकरने अचानक पेट घेतला. यावेळी कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणीवाहू टँकरने आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देकशेडी घाटात टँकरने घेतला पेटपोलादपूर पोलीसांनी घेतली घटनास्थळी धाव

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत कशेडी घाटामध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टँकरने अचानक पेट घेतला. यावेळी कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणीवाहू टँकरने आग आटोक्यात आणली. मात्र टँकर धुमसत असल्याने महाड नगरपरिषद आणि खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांनी आग पूर्णपणे विझविण्याचे काम केले.पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील प्रतापगड पॉर्इंट भोगाव गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक ज्वालाग्रही रसायनवाहू टँकर (जीजे ०६एवाय ८१८८) हा गुजरातकडून लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एमटीबीइ नावाचे केमिकल वाहून नेत असताना अचानक टँकरच्या ड्रायव्हर केबिन आणि पुढच्या टायर्समधून धूराचे लोट येऊन टँकरने पेट घेतला.या घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस उपनिरिक्षक भोईर, पोलीस नाईक इकबाल शेख, वाहतुक पोलीस विश्राम गुंजाळ, राज पवार, वसंत जाधव आदींनी तसेच कशेडी टॅपचे पोलिस नाईक तोडकर, तडवी, मोहिते, दूरगावडे, पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या दरम्यान, याच ठिकाणाहून पाणीवाहू ट्रॅक्टर जाताना पाहून या ट्रॅक्टरमधील पाण्याचा मारा करून पेटत्या टँकरची आग आटोक्यात आणली.टँकरला आग लागल्यानंतर कशेडी घाटातील वाहतूक काहीशी मंदगतीने सुरू राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे खेड नगरपरिषद आणि महाड नगरपरिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला.

महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब पोहोचताच तातडीने धुमसणाऱ्या टँकरवर पाण्याचा जोरदार मारा करून आग पूर्णत: विझविण्यात यश आले. यावेळी खेड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब पोहोचला आणि त्याद्वारे घाटरस्त्यावर पडलेले निसरडे तेल व वंगणयुक्त पाणी धुवून रस्ता वाहतुकीला योग्य करण्यात आला. 

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी