रत्नागिरी : जिल्ह्यात श्रीराम जयंती अर्थात रामनवमीचा सण शांततेत साजरा करण्यात आला. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करीत भाविकांनी घरातच श्रीरामाची पूजा केली.
चाैदा वर्षांचा वनवास पूर्ण करून श्रीराम ज्यादिवशी अयोध्येत परतले तो दिवस ‘रामनवमी’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा, अभिषेक, पूजा, कीर्तन, महाप्रसाद, भजन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र गतवर्षीही लाॅकडाऊन असल्यामुळे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला नाही. यावर्षीही लाॅकडाऊन असल्याने जन्मोत्सव साजरा करता आला नाही. भाविकांनीही शासकीय नियमावलींचे पालन करीत घरीच पूजाअर्चा केली. कोरोना संकट निवारणाचे साकडे प्रभू रामचंद्रांकडे घालण्यात आले.
रत्नागिरीतील राम मंदिरामध्येही यंदा कोरोनामुळे कोणतेही कार्यक्रम करण्यात आले नाहीत. केवळ मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत राम जन्माचे विधी पार पाडण्यात आले.