रत्नागिरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा सण शनिवारी जिल्ह्यात आनंदाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या मूर्तींचे शनिवारी सायंकाळी वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
दसरा सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. घरोघरी पूजाअर्चा, शस्त्रास्त्र पूजन करण्यात आले. व्यापाºयांनीही आपल्या दुकानातील वजने मापे व अन्य साहित्यांची पूजा केली. मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे मंदिराचा परिसर फुलून गेला होता. तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
या दिवशी सोने किंवा नवीन वाहने घेण्यासाठी दुकानांमधून गर्दी दिसत होती. सायंकाळी ठिकठिकाणी विराजमान झालेल्या दुर्गामातेच्या देवींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पावसाचे सावट होते. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला.
रत्नागिरी शहरातील मांडवी किनाºयावर देवीच्या विसर्जनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचेही पाहायला मिळत होते. समुद्रकिनाºयावर आरती केल्यानंतर देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.सोशल मीडियावरही शुभेच्छा वर्षावदसरा सणानिमित्त अनेकांनी मंदिरांमध्ये आपट्याची पाने लुटून एकमेकांना देत दसºयाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांबरोबरच सोशल मीडियावर सकाळपासून शुभेच्छांचे मॅसेज फिरत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या मित्रपरिवाराला शुभेच्छा दिल्या.