रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. कधी उकाडा, तर कधी गारवा असे वातावरण बदलू लागले आहे. या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून आजारपण वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मध्येच मळभाचे वातावरण असल्याने उकाड्यात अधिक भर पडत आहे. सध्या रत्नागिरीचे वातावरण ३५ ते ३६ अंशावर पोहोचू लागले आहे. उकाडा वाढल्याने अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
कुलाबा येथील हवामान खात्याच्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २१ व २२ मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.