शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Ratnagiri: मुरूड समुद्रकिनारी पुन्हा सापडला चरस, दापोली पोलिसांकडून शोध मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:07 PM

पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच ठेवणार

दापोली : तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी चरसची पाकिटे सापडल्यानंतर या भागात पाेलिसांकडून शाेध माेहीम सुरू करण्यात आली आहे. या शाेध माेहिमेत गुरुवारी (१७ ऑगस्ट) मुरूड येथे आणखी ८ अफगाणी चरसची पाकिटे सापडली आहेत. आज, शुक्रवारी आघारी येथे आणखी ४ पॅकेट चरस आढळले. सलग चार दिवस दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर चरसचे पॉकेट आढळून येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील केतकीच्या बनात सोमवारी (१४ ऑगस्ट) चरसची १२ पाकिटे सापडली हाेती. ही पाकिटे गुजरात येथे पकडण्यात आलेल्या चरसच्या पाकिटांशी मिळती जुळती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बुधवारी (१६ ऑगस्ट) हर्णै नवानगर येथे समुद्रकिनारी ८ पाकिटे सापडली हाेती. ही पाकिटे पाेलिसांनी जप्त केली आहेत. त्यानंतर दापोली हर्णै दूरक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक बी. डी. पवार, हर्णै दूरक्षेत्राचे दिलीप नवले यांनी हर्णै ते मुरूड दरम्यान शाेध मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. हर्णै नवानगर, मुरुड, कर्दे या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मुरूड किनारी पुन्हा आठ चरसची पाकिटे सापडली आहेत. त्याचा पंचनामा करून ती जप्त करण्यात आली आहेत. पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी दिली आहे.रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड समुद्रकिनारी शोध मोहीम राबवली जात आहे. समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आल्यास पोलिसांना खबर देण्याचे आवाहन दापोली पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी केले आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीPoliceपोलिस