चिपळूण : खेळता-खेळता एयरगन रोखून चाप ओढल्याने त्यातून सुटलेला छर्रा लागून यश सुधीर धांगडे (७, रा. कामथे, हुमणेवाडी) हा बालक जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली. त्याला उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे.याबाबत चिपळूण पोलीस स्थानकातून दिलेल्या माहितीनुसार यश हा आपल्या काही मित्रांसोबत घराच्या परसवात खेळत होता. त्यावेळी एका दहा वर्षीय मुलाने घरातून एयरगन आणली. छर्रा भरलेली एयरगन त्याने यशच्या समोर धरली आणि त्याने चाप ओढला. बंदुकीतून सुटलेला छर्रा सुसाट वेगाने यशच्या उजव्या बाजूच्या बरगडीमध्ये घुसला आणि तो खाली कोसळला. वेदनेने तो तडफडू लागला.यश जखमी झाल्याचे समजताच त्याचे मित्र घाबरले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला. घरातील माणसांनी धाव घेत यशला सर्वप्रथम चिपळूणच्या एका रुग्णालयात घेऊन गेले. नंतर त्याला कऱ्हाड येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत. याप्रकरणी अद्यापही कोणी तक्रार दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.बंदूक पोलिसांच्या ताब्यातही एयरगन सचिन शांताराम हुमणे यांच्या मालकीची आहे. त्यांनी शेतीच्या कामासाठी बंदुकीचा वापर करत असल्याचे पोलिसांना जबाबात सांगितले. ही एयरगन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
खेळता-खेळता बंदुकीतील छर्रा लागून बालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 4:21 PM
खेळता-खेळता एयरगन रोखून चाप ओढल्याने त्यातून सुटलेला छर्रा लागून यश सुधीर धांगडे (७, रा. कामथे, हुमणेवाडी) हा बालक जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली. त्याला उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे.
ठळक मुद्देखेळता - खेळता बंदुकीतील छर्रा लागून बालक जखमीचिपळूण तालुक्यातील कामथे येथील घटना, कऱ्हाड येथे उपचार सुरू