शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मुलांचे आजही शिक्षण भीतीच्या छपराखाली

By admin | Published: February 12, 2016 10:13 PM

गुहागर तालुका : कोंडशृंगारी उर्दू शाळा भौतिक सुविधांपासून वंचित; दरड कोसळण्याचा धोका

शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कोंडशृंगारी उर्दू शाळेकडे जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा भौतिक सुविधांपासून वंचित आहे. शाळेला चिटकून गेलेली विजेची तार, संरक्षक भिंत व वर्ग खोल्यांच्या समस्यांनी शाळेला ग्रासले आहे. प्रशस्त जागा असूनही शाळेला संरक्षक भिंत नसल्याने दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे, पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, असे असताना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असलेल्या शाळेकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. याउलट गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे खासगी शाळांचे पेव फुटले असतानादेखील येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळेची पटसंख्या अडीचशेच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेला पालक पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. या शाळेची इमारत दोन्ही बाजुच्या रस्त्याला लागून असून, या मार्गावर कायम रहदारी असते. शाळेला लागून असलेले रस्ते तीव्र चढाचे आहेत. त्यामुळे वाहने वेगाने येतात. मात्र, याठिकाणी शाळेला संरक्षक भिंत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. कीचन शेडच्या मागे केव्हाही दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच भिंतीजवळ लहान मुलांचे खेळाचे साहित्य आहे, तर वेळंब रोडकडे जाणाऱ्या रस्त्याकडे शाळेला चिटकून विजेची तार गेलेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा हात या तारांना लागण्याची भीती आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला याविषयी कल्पना देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मुलांचा विजेच्या तारा, दरड व रस्ता अपघात होण्याच्या भीतीने जीव टांगणीला लागला आहे. संबंधित विभागाकडे याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे, मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)सभापतींकडून दखल : प्रशासनाचे दुर्लक्षशाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग कमी पडू लागले आहेत. दोन वर्ग एकत्र बसवून सध्या अध्यापनाचे काम सुरू आहे. शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र, डिजिटल शाळा अशा पोकळ गप्पा मारण्यापूर्वी शाळेला भौतिक सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती राजेश बेंडल यांनी शाळेची पाहणी केली होती. शाळेचे शौचालय व नवीन इमारत बांधकामाचा दर्जा पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यासोबत असणाऱ्या अभियंत्याने संरक्षक भिंतीची मापे घेतली होती. मात्र, सभापती बदलल्यानंतर हे काम थांबले आहे.