चिपळूण : तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिराच्या रस्त्यालगत तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यूमुखी पडला. ही घटना शुक्रवारी पहाटे ५च्या सुमारास निदर्शनास आली. तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिरालगतच्या रस्त्याच्या कडेला सुमारे ५ वर्षे वय असलेला बिबट्या तारेच्या फासकीत अडकला होता. हा बिबट्याची लांबी २०० सेंटीमीटर होती. कामथे येथील ग्रामस्थ अजित कासार यांनी चिपळूण वन विभागाला माहिती दिली.वन विभागाचे वनरक्षक रामदास खोत, दत्तात्रय सुर्वे, वनरक्षक नितीन बोडके, परिक्षेत्र वन अधिकारी सचिन नीलख, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल आर. बी. पाताडे, वनरक्षक जी. एल. मडके, सावर्डे वनपाल सदानंद घाडगे यांनी बिबट्याला पिंजऱ्यात टाकून पशु चिकित्सालय दवाखान्यात आणले.
वैद्यकीय अहवालात बिबट्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पशुधन विकास अधिकारी एन. एस. बर्वे, सचिन नरळे यांनी बिबट्याचे विच्छेदन केले. त्यानंतर पिंपळी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..