शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चिपळूणचा पराभव सेनेच्या जिव्हारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 6:15 PM

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सेनेचे संघटन पूर्णत: अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देचिपळूणचा पराभव सेनेच्या जिव्हारीशहरप्रमुखांच्या पाठोपाठ तालुकाप्रमुखांचाही राजीनामा

चिपळूण : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सेनेचे संघटन पूर्णत: अडचणीत आले आहे.यावेळची विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थाने अटीतटीची झाली. या विधानसभा निवडणुकीत सेनेने जिल्ह्यात भाजपला जराही संधी न देता पाचही जागांवर उमेदवार दिले. या पाच जागांपैकी चिपळूणची जागा खात्रीशीर निवडून येणार, असे सेनेला तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही अपेक्षित होते.

गेली दहा वर्षे चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघात सेनेला ताकद देण्याचे काम माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केले. चिपळूणचे आमदार म्हणून सलग दोन वेळा विजय मिळविला आहे. मात्र, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच जागांपैकी एकमेव चव्हाण यांचा पराभव झाल्याने त्याचा जोरदार धक्का येथील शिवसैनिकांना बसला आहे. त्यांच्या या पराभवावर अजूनही येथील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा विश्वास बसत नाही. यातूनच शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.शहरप्रमुखांच्या राजीनाम्यानंतर तालुकाप्रमुख शिंदे यांनीही तितक्याच घाईघाईने राजीनामा दिला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार चव्हाण यांनी शिवसैनिकांना खचून जाऊ नका, असे आवाहन केले होते.

एवढेच नव्हे, तर लक्ष्मीपूजनानिमित्ताने त्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन तातडीने पुढील कामाला सुरुवात केली आहे. असे असताना शहरप्रमुख उमेश सकपाळ आणि त्यांच्या पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने येथील शिवसैनिक पूर्णत: खचून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नुक त्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सेनेचा बालेकिल्ला असलेल्या चिपळुणातून चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सेनेत उलटसूलट चर्चा सुरू आहे. अशातच मतदार संघातील पकड कमी होऊ नये यासाठी गेली दहा वर्षे आमदार म्हणून मतदार संघातसहीत जनतेच्या संपर्कात असणाऱ्या माजी आमदार चव्हाण यांचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी युवा सेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना